विराट सेनेचे विजयाचे लक्ष्य, सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता

रांची : वन-डेमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज शनिवारपासून प्रारंभ होणा-या टी-२० मालिकेतही विजयाची लय कामय राखण्यास उत्सुक आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखताना आॅस्ट्रेलियाचा वन-डे मालिकेत ४-१ ने पराभव करीत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. टी-२० मानांकनामध्ये ५व्या स्थानावर असलेला भारतीय संघ शनिवारी जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देत मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसºया बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियन संघाचे लक्ष्य भारताविरुद्ध २०१६ मध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याचे आहे.