गुजरात मध्ये विकास जातीवादी क्रॉस लाईन

भारताचे बोलके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीचे एक वाक्य आहे अब देश निकल पडा है , विकास या शब्दाभोवती फिरणारी मोदीशाही आपल्या मूळ आयुध उपसत राजकारणाचे धर्मकारण करू लागली आहे . महात्मा चाणक्याने म्हटल्याप्रमाणे राजनीतीचा धर्म असावा मात्र धर्माची राजनीती नसावी . भाजपची गुजरात मधील दमछाक पाहता जो त्यांनी रोख घेतला आहे तो धर्मनिरपेक्ष भारताची कल्पना करणाऱ्या लोकांना क्लेश देणारा आहे . काल नरेंद्र मोदी यांनी गुजरात विकास रथ या कार्यक्रमात राजकीय परिघातून धर्माचा फुत्कार सोडला . राहुल गांधी यांच्या परनानाची आठवण करून देत मोदींनी सोमनाथ मंदिर मध्ये राहुल गांधी यांच्या प्रवेशावरून नाक मुरडले . मंदिरात " अहिंदू " असी नोंद झाल्यावर देशात विकास सोडून धर्माची चर्चा सुरु झालेली आहे . भाजपने मतदारांना विकासाच्या मुद्द्यावरून धर्म मुद्द्यावर घेऊन जाने म्हणजे राहुल गांधी यांना मुलगी देऊन जावई करायचे काय असा प्रश्न मनात येण्यासारखे आहे . कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन या प्रश्नावरून सोशल मीडियामध्ये वादळ निर्माण झालं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराला नुकतीच राहुल गांधींनी भेट दिली. यावेळी मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना त्यांची नोंद अहिंदू या रकान्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या नोंदीपुढे राहुल यांची सही नसून ही नोंद माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन यावरून याआधी देखील वादळ निर्माण झालं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने राहुल गांधी यांचं पालनपोषण सोनिया गांधी यांनी ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे केल्याचा उल्लेख केला होता. यावर राहुल गांधी यांनी खुलासा केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी जाहीरपणे आपला धर्म सांगण्याचे आत्तापर्यंत टाळले आहे. त्यांचा दावा हा सेक्युलर आचारसरणीचा आहे, मात्र सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा धर्म कुठला यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सोमनाथ मंदिरातल्या त्या नोंदीमुळे त्यात भर पडली आहे. दरम्यान, ट्विटरवर हा हॅशटॅग अव्वलस्थानी असून एकच चर्चा आहे, ती म्हणजे राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन? सोमनाथ मंदिरात 'अहिंदू' अशी नोंद झाल्यानंतर सुरू झालेल्या वादावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ हिंदू नसून ते जानवेधारी हिंदू आहेत असे वक्तव्य करत काँग्रेसचे गुजरातमधील ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणाला भाजपला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी यांची अहिंदू म्हणून रजिस्टरमध्ये नोंद होण्यामागे भाजपचा हात असल्याचा थेट आरोपच सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला . सगळा वाद ज्या काळात अन ज्या धर्तीवर उभा केला आहे त्यात निव्वळ मताचे राजकारण आहे, नाहीतर राहुल गांधी यांच्या हिंदू असण्या नसण्याचे निमित्त असायला कुठल्या भाजपेयीला राहुल जावई करून घ्यायचे नसावेत . गेली तीन दशक भाजपचा अयोध्या हा मूळ अन मुख्य मुद्दा राहिलेला आहे . असे असताना सोमनाथ प्रवेश भाजपच्या बुडाला कळ लावणारा ठरणारच होता . ...............

रामलल्लाचे दर्शन खुले कॉंग्रेस ने केले .

१९८९ ला राम लल्ला चे दर्शन खुले करण्याचा मान कुणाला द्यायचा असेल तर तो कॉंग्रेस अन स्व.राजीव गांधी यांना द्यावे लागेल . तत्कालीन लोकसभा प्रचाराचा शुभारंभ करून राजीव गांधी यांनी भाजपची अडचण केली होती . त्याकाळी कमळाबाईला माझा राम चोरला ग बाई असेच म्हणावे लागले असावे . राम सोडून भाजप मध्ये राम नाही हे बऱ्यापैकी ठाऊक असणाऱ्या भाजपेयींना सोमनाथ मंदिरातुन राहुल प्रवेश म्हणूनच खटकला असावा ? म्हणूनच राहुल हे हिंदू नसल्याचा कांगावा केला आहे . आई कथेलिक असेल ही मात्र बापाची जात लावण्याचा रिवाज भारतात असल्याने राहुल हिंदू म्हणून नाकारण्यास निव्वळ राजकारण समजले पाहिजे . ...............