भाजपला घराणेशाहीचा कोंब राहुलच्या हाती गांधीविचाराचा पक्ष अन मोदींना पोटसूळ

 

भाजपला घराणेशाहीचा कोंब
राहुलच्या हाती गांधीविचाराचा पक्ष अन मोदींना पोटसूळ

 

नरेंद्र मोदी गुजरात मध्ये व्यस्त आहेत . कुठल्याही परीस्थितीत कच्च चे रण त्यांना जिंकायचे असून त्यासाठी सवैधानिक सर्व आभूषणे बाजूला सोडून त्यांच्यातला प्रचारक ५६ इंच ची छाती घेऊन गांधीच्या भूमीत जीवाचे रान करत आहे . याच वेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची उमेदवारी भरली असता त्यावर मोदी यांनी वलसाड मधील  धर्मपुर येथील निवडणूक सभेत राजकीय धर्म मोडत राहुल गांधी यांच्या अध्यक्षपद अर्जाला औरंगजेब राज संबोदले . तसे पाहितले तर पक्षीय निवडी निवडणुकीतून करणारा पहिला नेता म्हणून भारताचा राजकीय इतिहास ज्याची दखल घेईल ते राहुल गांधी असतील . मात्र राहुल गांधी हे अनुवंशाने राजीव गांधी यांचे पुत्र असल्याने त्यांच्या हातात कॉंग्रेस पक्षाची धुरा येणे म्हणजे घराणेशाही म्हटले जाऊ शकते मात्र त्या पक्षाच्या मोदींनी म्हणावे काय ज्या भाजपमध्ये डझनभर घराणे सत्तेच्या ताटात सोन्याचे चमचे घेऊन सत्तामृत वरपतात .
   पोरीची लग्न झाले की ती  माहेरची पाव्हणी बनते , बाकी तिचे हक्काचे ते सासर अन सासरचे नाव , हा नियम भारतातील प्रत्येक स्त्रीला आहे  मात्र सोनिया गांधी अपवाद ठरवल्या  . पती राजीव गांधी यांच्या सोबत लग्न करून इटली सोडणाऱ्या सोनिया वहीनिंना केटलीवाल्या बाबांनी विदेशी ठरवत राष्ट्रवाद जागृत केल्याचे आपल्याला आठवत असेल . शरद पवारांनी देखील आपल्या राजकीय महत्वकांक्षा  तडीस नेण्यासाठी कायम सोनियागांधी यांना गतिरोधक समजून त्यांच्या विदेशी मुद्याला हात घालत वेगळी चूल मांडलेली आहे . शरद पवारांचा खडा फेकलेल्या दिशेला नसतोच मुळात , त्यामुळे त्यांनी सोनिया गांधी यांचा आकस धरावा हा काही फार चर्चेचा विषय नाही . मात्र मोदी अन त्यांच्या भाजपेयींना सोनियाराज औरंगजेबाची आठवण करून देते हे कीव यावी असेच आहे . कुणाला आठवत असेल नसेल मात्र राजीव गांधी यांच्या हत्येनंतर  एनडीए सरकारचा पराभव करून २००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा पंतप्रधानपद स्वीकारण्यास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नकार दिला होता. आपण आपल्या 'अंतर्मना' चा आवाज ऐकून पंतप्रधानपद नाकारत आहोत, असे सोनियांनी त्या वेळी सांगितले होते; परंतु सोनियांनी पंतप्रधानपद न स्वीकारण्यामागे राहुल यांची भीती होती. सोनिया पंतप्रधान झाल्यास आजी इंदिरा व वडील राजीव यांच्याप्रमाणेच त्यांचीही हत्या होईल, अशी भीती राहुल यांना वाटत असल्याने सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले, असा दावा माजी परराष्ट्रमंत्री व एके काळी गांधी घराण्याचे अगदी निकटवर्तीय असलेल्या नटवरसिंग यांनी ३० जुलै २०१४ रोजी केलेला आहे .  ८३ वर्षांचे नटवरसिंग इंदिरा तसेच राजीव गांधी यांच्या काळात त्यांचे अगदी निकटवर्तीय मानले जात. यूपीए-१ मध्ये ते परराष्ट्रमंत्रीही होते. मात्र इराकला तेलाच्या बदल्यात अन्न पुरविण्याच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहारातून उठलेल्या वादळात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. नटवरसिंग यांचे ' वन लाइफ इज नॉट इनफ : अ‍ॅन ऑटोबायोग्राफी ' हे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त एका चित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नटवरसिंग यांनी हा दावा केला. सोनियांनी पंतप्रधानपद नाकारण्याची ही घटना या पुस्तकात प्रकाशित करू नये, अशी गळ घालण्यासाठी सोनिया गांधी आपली कन्या प्रियंका वडेरा हिच्यासह गेल्या ७ मे रोजी आपल्या निवासस्थानी आल्या होत्या. मात्र "सत्य" मांडायचेच, असे आपण ठरवले होते, असे प्रतिपादन नटवरसिंग यांनी केले. आपली आजी आणि वडील यांच्याप्रमाणेच आईचीही हत्या होईल, या भीतीने राहुल यांनी सोनियांना पंतप्रधान बनू देण्यास नकार दिला.
     भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह व त्यांचा मुलगा राजकारणात आहे. जयंत सिन्हा हा यशवंत सिन्हा यांचा मुलगाच आहे ना  . महाराष्ट्रात पूनम महाजन,  हिना गावित यांना उमेदवारी दिली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला संजय मंडलिक आणि सांगलीतही घराणेशाही पाहूनच भाजपने उमेदवार निवडला नव्हता काय . रावसाहेब दानवे चे संतोष आणि लोणीकरांचा  राहुल आमदार कसा झाला आहे ? एकनाथ खडसे च्या लाडक्या सुनबाई खासदार आहेत. बीड च्या मुंडे भगिनी तर अपवाद कुठे आहेत . विषय एवढाच आहे घराणेशाही ला लोकाश्रय आहे ज्यास वारसा संबोधून लोक स्वीकारतात अगदी त्याच नियमाने राहुल गांधी यांचे अध्यक्ष पद समजून घेतले पाहिजे . महायुतीतही आजोबापासून ते नातवांपर्यंत घराणेशाही आहे. पंजाबमध्ये भाजपची युती असलेल्या सहयोगी पक्षात तर पूर्ण घराणेशाही असून भाजपने अनेक घराण्यांना उमेदवारी दिली आहे, यावरून भाजपही घराणेशाहीवरच उभा आहे हे सिद्ध होते. त्यामुळे मोदींना घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का याचा विचार झाला पाहिजे . समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, डीएमकेचे नेते स्टॅलिन, शरद पवारांचे अजित पवार सुप्रिया सुळे कोण आहेत , उद्धव ठाकरे मातोश्रीचा वारसा चालवतात मग त्याला घराणेशाही म्हणता येईल का ?  भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, अभिषेक बच्चन, अंबानी परिवाराचा रिलायन्स उद्योगसमूह ही घराणेशाहीचीच उदाहरणे आहेत की! मग राहुल गांधी यांच्याकडे पाहून नाके मोडणे सयुक्तिक समजता येईल का ? सगळा देशच घराणेशाहीवर चाललाय. चित्रपटश्रुष्टीतील घराणेशाही वर तर बोलायला नको . सगळीकडचे वारस ज्या भारतात स्वीकारले जात असतील तर राहुल गांधी यांचा विटाळ भारतीयांना असण्याचे कारण नाही . यापुढे जाऊन हे देखील जाणून घेतले पाहिजे की राहुल यांचा तिडक भारतीयांना आहे का फक्त भाजपेयीना . कारण भारतीयांना राहुल गांधी राजीव यांचे चिरंजीव म्हणून चालतात ज्या राजीव यांचे शांतीसाठी असंख्य तुकडे भारतीयांनी सहन केलेले आहेत .

Photo: